मानुषीला पाहिल्यावर काय म्हणाल मनाशी? सौंदर्य असं की...

सकाळ ऑनलाईन टीम

माजी विश्वसुंदरी म्हणून मानुषी छिल्लर ही नेहमीच सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते.

मानुषी आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे.

2017 मध्ये मानुषीनं विश्वसुंदरीचा मुकूट प्राप्त केला. त्यानंतर ती नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहे.

प्रियंका चोप्रानंतर तब्बल वीस वर्षांनी मानुषीनं विश्वसुंदरी म्हणून स्वताची ओळख निर्माण केली होती. आता ती बॉलीवूडमध्ये लोकप्रिय होते आहे.

मानुषी गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची वाट पाहत होती. सोशल मीडि्यावर तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

मुळची हरियाणाची असणाऱ्या मानुषीला पृथ्वीराजनंतर मोठमोठ्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या ऑफर्स येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मानुषीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला लूक तिच्या सौंदर्याची ओळख करुन देणारा आहे. त्यावर तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.