रणवीर ने इंस्टाग्रामवर त्याचेच हॉट फोटो शेअर करत चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये दिपिका मात्र दिसत नाहीये.
रणवीर आणि दिपीका मालदिवला गेले असावेत, असे या फोटोंवरून वाटते. वाळूत दोघे खूप मजा करत असावेत, असा अंदाज फोटोंवरून लावता येतो.
रणवीरने फोटोंना First day of the rest of my life असे कॅप्शन देत अशा अंदाजात चाहत्यांना हॅपी न्यू इयर म्हटले आहे.
गेल्या वर्षी आलेल्या ८३ चित्रपटातील त्याच्या कामाची चांगलीच प्रशंसा झाली.
रणवीर त्याच्या हटके स्टाईलसाठीही ओळखला जातो.