मुकेश अंबानींची मुलगी ईशा घेणार रिलायन्स रिटेलची जबाबदारी!

सकाळ डिजिटल टीम

ईशा अंबानीला (Isha Ambani) आज परिचयाची गरज नाहीय. ईशा अंबानीची ओळख केवळ मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी एवढीच मर्यादित नाही, तर ईशानं सध्या बिझनेस विश्वात झेंडा रोवलाय.

एक यशस्वी बिझनेस वुमन (Business Woman) म्हणून ईशानं आपली ओळख निर्माण केलीय.

भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी गेल्या आठवड्यात रिलायन्स जिओची (Reliance Jio) कमान मोठा मुलगा आकाश अंबानीकडं सोपवली आहे.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता रिलायन्स रिटेलची कमान मुलगी ईशा अंबानीकडं सोपवू शकतात.

तुम्हाला माहित नसेल की, सुरुवातीच्या काळात ईशाला शिक्षिका व्हायचं होतं.

आता मात्र ईशा अंबानीनं एक यशस्वी बिझनेस वुमन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलीय.

30 वर्षीय ईशा अंबानीचा विवाह 12 डिसेंबर 2018 रोजी पिरामल ग्रुपच्या अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाला होता.

सेलिब्रिटींची एकूण संपत्ती सांगणाऱ्या एका वेबसाइटनुसार, ईशा अंबानीची एकूण संपत्ती सुमारे $100 दशलक्ष किंवा 800 कोटी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isha Ambani