अनेकांना जेवण सतत गरम करायची सवय असते. जेवण गरम करून खाणे ही चांगली सवय आहे.
पण अनेकदा जेवण सतत गरम केल्याने त्याचे शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
जेवणातील नेमके कोणते पदार्थ सतत गरम केल्याने घातक ठरू शकतात ते पाहूया.
पालक
पालकाच्या भाजीला पुन्हा-पुन्हा गरम करू नये. सतत गरम केल्याने यातील नायट्रोजनची मात्रा कमी होते.
अंडी
उकडलेल्या अंडीला पुन्हा उकडून खावू नका
बिट
बिटमध्ये नायट्रोजन असते. याला दुसऱ्यांदा गरम केलात तर हे विषाप्रमाणे काम करते.
चिकन
चिकनमध्ये प्रोटीनचे भरपूर प्रमाण असते. सतत गरम केल्याने यात टाॅक्सिस तयार होतात.
मशरूम
मशरूममध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असते. यामुळे याला फ्रिजमध्ये जादा ठेवू नये. तसेच गरमही करू नये.
बटाटे
बटाटा आधी उकडून ठेवू नका. ज्यावेळी त्याचा वापर करणार आहात त्याचवेळी उकडा.