स्ट्रेस आलाय, असा करा कमी

| Sakal

दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आपण दररोज खूप मेहनत करतो. रात्री 8 तासांची झोप घेतो. पण फक्त 8 तासांची झोप घेऊन शरीराला आराम मिळत नाही. त्यासाठी इतर उपाय करणे गरजेचे आहे.

| Sakal

पुरेशी झोप घेतल्यानंतरही काहीवेळा आपले अंग दुखते. शारिरिक थकवा जाणवत असतो. त्यामुळे आपण शारिरिक आरामाकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी योग, ध्यान, स्ट्रेचिंग आणि मसाज यासारख्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

| Sakal

आरोग्यासाठी मानसिक विश्रांती अत्यंत गरजेची आहे.रात्री मनात वेगवेगळे विचार घोळत असल्याने पुरेशी झोप होत नाही. हे मानसिक थकव्याचे लक्षण आहे. त्यामुळे अशा लोकांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी ध्यान, योगावर लक्ष देणे गरजेचे आहे.

| Sakal

कधीकधी भावनिकदृष्ट्या आपल्याला कमजोर वाटू शकतं.अशावेळी आपण आपल्या भावना ज्यांच्याशी शेअर करतो, त्यांच्याशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे. मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवल्यास फायदा होतो.

| Sakal

कामादरम्यान थोड्यावेळासाठी का होईना छोटा ब्रेक घेऊन आराम करणे गरजेचे आहे. स्क्रीनवरून लक्ष हटवून डोळ्यांना आराम देणे गरजेचे आहे.

| Sakal

जसा वेळ मिळेल तसा सामाजिक उपक्रमातही भाग घेणे गरजेचे आहे. असे केल्याने सामाजिक सक्रियता वाढेल.

| Sakal

आध्यात्मिक विश्रांती घेतल्याने तुम्ही शारिरिक, मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम करता. मनाला शांती मिळते.

| Sakal