सांगली जिल्हा बँकेवर 'मविआ'चा झेंडा, भाजप 4 जागांवर

अजित झळके & उल्हास देवळेकर

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकल्या

भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलने धक्कादायक निकाल नोंदवत चार जागांवर गुलाल नोंदवला आहे.

महाडिक, जमदाडे यांची कमाल, दोन देशमुखांचा कमाल येथे दिसली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची सरळ लढत झाली.

तीन जागा बिनविरोध करत महाविकास आघाडीने आधीच गुलाल उधळला होता. उर्वरीत १८ जागांवर काय निकाल लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

महविकास आघाडीला १४ जागा मिळाल्या असून ४ जागांवर भाजपच्या पॅनेलने बाजी मारली आहे.

काँग्रेसचे सुनील ताटे, दिघंचीचे राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख यांचा पराभव केला आहे.

राष्ट्रवादीकडे आता ९, काँग्रेसकडे ५, शिवसेनेकडे ३ तर भाजपकडे ४ जागा आल्या आहेत.

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा महाविकास आघाडीचे शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी अकरा मतांनी पराभव केला.

आटपाडी तालुक्यात तानाजी पाटील यांच्या रुपाने तिसरे सत्ताकेंद्र निश्‍चित झाले आहे. यावेळी जल्लोषी वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.