'मोहेंजोदारो' चित्रपटातील 'चानी' आठवतेय का? या चित्रपटात चानी पात्र साकारलेली अभिनेत्री आहे तेलुगु चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde).
पूजा हेगडे तुळू भाषिक (कन्नडची उपभाषा) आहे, मात्र तिने 'मुगमुडी' या तमिळ चित्रपटातून करिअरला सुरवात केली.
या चित्रपटातील संवाद इंग्रजीमध्ये लिहून, ते लक्षात ठेवून पूजाने हा चित्रपट साकारला; मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल ठरला.
पूजा हेगडेच्या करिअरमधील दुसरा चित्रपट तेलुगुमध्ये होता, ज्याचं नाव होतं 'ओका लैला कोसम'. या चित्रपटात ती तेलुगु स्टार नागचैतन्याबरोबर झळकली.
या चित्रपटासाठी मात्र पूजाने चक्क तेलुगु भाषेचे धडे गिरवले, ज्याचा फायदा तिला एकामागून एक तेलुगु चित्रपटांचे ऑफर येण्यामध्ये झाला.
2014 मध्ये आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नीमुळे पूजा हेगडे मोहेंजोदारो' चित्रपटात झळकली; मात्र हृतिक रोशन नायक असलेला हा चित्रपट फ्लॉप ठरला.
यानंतर पूजा तेलुगु चित्रपटसृष्टीत परतली अन् तिने बारा तेलुगु अन् दोन तमिळ चित्रपटांमध्ये झळकली. तसेच तिचा आगामी हिंदी चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
पूजा हॉट अँड बोल्ड असून, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोज व व्हिडिओजना फॅन्स फॉलोअर्सचा मोठा रिस्पॉन्स मिळत असतो.