'पठाण' साठी शाहरुखनं घेतले १०० करोड, 'दिवाना' चं मानधन नाममात्र...

प्रणाली मोरे

शाहरुखनं(shahrukh Khan) आपल्या मेहनतीनं सिनेइंडस्ट्रीत मोठं नाव कमावलंय. त्याचं स्ट्रगलही त्यानं अनेकदा मुलाखतीतून बोलून दाखवलं आहे. उच्चशिक्षित असूनही सिनेमाच्या वेडापायी मुंबई गाठलेल्या शाहरुखनं सुरुवातीच्या दिवसांत अगदी रस्त्यावरही झोपून दिवस काढल्याचं म्हटलं होतं.

Esakal

आज तो किती मोठा स्टार आहे हे त्याचे सिनेमे पाहून कळतं,तर धनाढ्य स्टार म्हटलं की डोळ्यासमोर त्याचा मन्नत बंगला,मुंबईतलं सात मजली इमारतीचं ऑफिस अन् इतर प्रॉपर्टीचा आकडा हे सारं उभं राहतं. सध्या शाहरुख त्याच्या 'पठाण','जवान' सिनेमामुळे चर्चेत आहे. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख मोठ्या पडद्यावर चाहत्यांना भेटायला येणार आहे.

Esakal

सुरुवातील शाहरुखचा 'पठाण' सिनेमा प्रदर्शित होतोय. आता यामुळे चर्चा रंगलीय की शाहरुखनं सिनेमासाठी तब्बल १०० करोड घेतल्याची. आता इंडस्ट्रीत यशस्वी कारकिर्दींची ३० वर्ष पूर्ण केल्यावर इतका हक्क तर बनतो त्याचा.

Esakal

आज शाहरुखला तो मागेल तितकी रक्कम सिनेमासाठी दिली जाते. पण ३० वर्षापूर्वी तो नवोदीत कलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये आला होता तेव्हा मात्र परिस्थिती पूर्ण वेगळी होती. त्यानं 'दिवाना' सारखा हिट सिनेमा केला होता,ज्यात Rishi Kapoor आणि दिव्या भारती देखील होते. त्या सिनेमासाठी शाहरुखनं घेतलेल्या मानधनाची चर्चा 'पठाण'साठी त्यानं १०० करोड घेतल्यावर जोरदार रंगली आहे.

Esakal

१९९२ साली शाहरुखचा तो सिनेमा आला होता. या सिनेमासाठी शाहरुखला सायनिंग अमाऊंट म्हणून ११ हजार रुपये मिळाले होते. तर संपूर्ण सिनेमासाठी केवळ १.५० लाख रुपये मिळाले होते. पण या सिनेमासाठी शाहरुखला मानधनापेक्षा जास्त मिळालं ते त्याच्या चाहत्यांचे प्रेम. सिनेमा सुपरहिट ठरला अन् शाहरुखही प्रकाशझोतात आला.

Esakal

यानंतर मात्र शाहरुखनं मागे वळून पाहिलं नाही,तो इंडस्ट्रीचा बादशहा,किंग खान म्हणून ओळखला जातो. 'पठाण' सुपरहिट ठल्यावर कोण जाणे त्याला इंडस्ट्रीचा 'पठाण' म्हणूनही संबोधतील तर नवल नव्हे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal