कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) साधारणपणे 72च्या आसपास असतो. 70 पेक्षा अधिक ग्लायसेमिक इंडेक्स असणारी फळे मधुमेहींसाठी हाय रिस्क कॅटेगरीत मोडतात.
ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्या पदार्थांमधून साखर रक्तात लवकर मिसळते.
कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. डायबिटीज फाउंडेशनच्या मते याच कारणामुळे कलिंगडामुळे डायबिटीजच्या रुग्णांना होणारं नुकसान तुलनेनं कमी असते.
तज्ज्ञांच्या मते कलिंगड ज्यूसमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स अधिक प्रमाणात आढळतो, जो डायबिटीज पेशंटसाठी हानिकारक ठरू शकतो.
संशोधकांच्या मते रक्तातील साखरेचा अंदाज ग्लायसेमिक लोडच्या (GL) माध्यमातून लावायला हवा.
ग्लायसेमिक लोड ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण चेक करून तपासला जातो.
10 पेक्षा कमी ग्लायसेमिक लोड (कमी), 10-19 मिडीयम (मध्यम), 19 पेक्षा अधिक प्रमाण धोकादायक मानलं जातं.
कलिंगडामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स 72च्या आसपास असतो, परंतु 100 ग्रॅम कलिंगडाचा ग्रायसेमिक लोड केवळ 2 असतो.
जर योग्य प्रमाणात कलिंगड खाल्ले तर डायबिटीजमुळे कोणतंही नुकसान होत नाही.
कलिंगड खायचं असेल तर त्याला फॅट आणि प्रोटीनयुक्त आहार घेऊन बॅलन्स केलं तर डायबिटीज पेशंटसाठी फायदेशीर ठरते.