पहिल्या नजरेतच तिने श्रेयसला केले क्लीनबोल्ड !

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता श्रेया तळपदे (Shreyas Talpade) आणि त्याची पत्नी दीप्ती (Dipti Talpade) या गोड जोडप्याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे.

Shreyas Talpade

तर कॉलेजमधील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्याचे निमित्त झाले आणि दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. त्यावेळी श्रेयसला दीप्ती पाहताक्षणी आवडली तर दीप्तीला श्रेयसचा साधेपणा भावला.

Shreyas Talpade

2000 रोजी श्रेयसला कॉलेजच्या एका फेस्टसाठी बोलवण्यात आले होते. कॉलेजच्या त्याच फेस्टिवलमध्ये दीप्ती सेक्रेटरी होती. श्रेयसला दीप्तीशी पहिल्या नजरेतच प्रेम झाले.

Shreyas Talpade

श्रेयस दीप्तीसाठी असा काही वेडा झाला होता की पुढे चार दिवसांतच त्याने दीप्तीला प्रपोजही केले. दीप्तीने होकार दिला आणि मग दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले.

Shreyas Talpade

पुढे जोडीदार होऊन ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे अख्खे आयुष्यच पालटले.

Shreyas Talpade

2004 साली श्रेयस व दीप्ती लग्नबंधनात अडकले. 14 वर्षांनंतर 4 मे 2018 मध्ये श्रेयस आणि दीप्ती सरोगसीद्वारे आई-बाबा बनले असून त्यांना एक मुलगी आहे.

Shreyas Talpade

दीप्ती खंबीरपणे श्रेयसच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. दुसरीकडे श्रेयसही आपल्या सगळ्या यशाचे श्रेय दीप्तीलाच देतो. करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी दीप्ती पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही असं श्रेयस सांगतो.

Shreyas Talpade

27 जानेवारी 1976 मध्ये मुंबईत श्रेयसचा जन्म झाला. मराठी टीव्ही शोमधून श्रेयसने आपल्या अभिनयातील करियरला सुरुवात केली.

Shreyas Talpade

2005 मध्ये श्रेयसने ‘इक्बाल’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात केलेल्या अभिनयाने त्याचं सर्वत्र जबरदस्त कौतुक झाले.

Shreyas Talpade

‘इक्बाल’नतंर त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. अनेक चित्रपटांतून श्रेयसने साकारलेल्या महिला भूमिकांनाही, त्याचा लुक, कॉमेडी, अभिनयाला चाहत्यांची भरभरुन दाद मिळाली.

Shreyas Talpade

श्रेयसने मराठी प्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत देखील आपली उत्तम कामगिरी पार पाडली. 'आभाळमाया', 'अवंतिका', 'दामिनी', 'बेधूंद मनाची लहर' यांसारख्या छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांमध्ये आपल्या चांगल्या अभिनयाने सिनेसृष्टीत अस्थित्व निर्माण केले.

Shreyas Talpade

त्यानंतर 'ओम शांती ओम', 'गोलमाल' या सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आपली चमक दाखून दिलीere

Shreyas Talpade

सध्टेया तो लिव्हिजनच्या झी मराठी या वाहिनीवर 'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या अभिनेत्री सोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Talpade