लहान मुलांना जेवण भरवणे म्हणजे मोठे दिव्यच असते. जेवताना मुलं बरीच नाटकं करतात; पण आपण त्यांना उपाशीसुद्धा ठेवू शकत नाही. मुलांची ही नाटकं हाताळायची कशी आणि त्यांना नियमित आहाराची सवय लावायची कशी हे पाहू या...
फूड गेम आणि स्पर्धा
मुलांनी आनंदाने खावे असे वाटत असेल तर जेवणाला एखाद्या खेळाचा एक भाग बनवा आणि जेवण कोण आधी संपवेल याची स्पर्धा त्यांच्यासोबत लावा.
बाहेर फिरायला जाणे
मुले जेवण्यासाठी जास्तच नाटके करत असतील तर त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला जायचे असल्याचे सांगा.
गोष्ट सांगा
जेवताना मुलांना एखादी गोष्ट सांगा, जेणेकरून त्यात मग्न होऊन मुलं घास तोंडात घालतील.
सजावट
एखादा पदार्थ मुलांना खायला देताना तो आकर्षक पद्धतीने सजवा.
रंगीत ताटे
मुलांसाठी वापरली जाणारे ताट-वाट्या, पेले रंगीत, आकर्षक, त्यांच्या आवडीनुसार असू द्या.