नीलेश अडसूळ
स्मिता गोंदकर गेली बरीच वर्षे मराठी मनोरंजन विश्वात काम करत आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिका केल्या आहेत.
जस्ट गंमत, माया, माझ्या नवऱ्याची बायको, मिस्टर आणि मी, मुंबईचा डब्बेवाला, वॉन्टेड बायको नं. अशा अनेक चित्रपटातून ती झळकली आहे.
तिने अनेक मालिकांमधून पण अभिनय केला. पण तिला खरे यश मिळाले ते 'पप्पी दे पारूला' या गाण्यामुळे. हे गाणे भलतेच लोकप्रिय ठरले. या गाण्यात स्मिताने बिकिनी लुक दिला होता.
त्यांनतर 'बिग बॉस मराठी'ने स्मिताला वेगळी ओळख मिळवून दिली. ती केवळ अभिनेत्री नसून उत्तम बाईक रायडर आहे. गाड्या घेऊन चित्त थरारक स्टण्ट करण्यातही ती माहीर आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.