निवृत्तीनंतरही देशसेवेचे व्रत घेणारा सैनिक; जनतेच्या सेवेस सज्ज

मोहन मेस्त्री

सैन्यात भरती झाल्यापासून निवृत्तीपर्यंत सैनिकांची अखंड देशसेवा सुरूच असते. निवृत्तीनंतरही त्यांच्या जगण्यातील शिस्त मोडत नाही. अश्याच कोल्हापुरील सैनिकाची कहाणी

pandurang sarnaik | Esakal

देशाच्या सीमा रक्षणासाठी बंदूक घेऊन उभा राहणारे कोल्हापुर गिरगाव (ता. करवीर) मधील पांडुरंग कोंडिबा सरनाईक हे निवृत्तीनंतरही सुरक्षारक्षक म्हणून जनतेच्या सेवेला उभे आहेत.

pandurang sarnaik | Esakal

सरनाईक यांनी वीस वर्षे सैन्यात सेवा बजावली. त्यापैकी तब्बल बारा वर्षे श्रीनगरमध्ये सेवा केली.

pandurang sarnaik | Esakal

नागपूर, बेळगाव मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सेवा बजावताना त्यांनी २०१४ मध्ये हवालदार पदावरून निवृत्ती घेतली.

pandurang sarnaik | Esakal

निवृत्तीनंतर सरनाईक यांनी पुन्हा बंदूक खांद्याला लावून पंजाब सिंध बँकेत सुरक्षारक्षक म्हणून जनतेच्या सेवेसाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला.

pandurang sarnaik | Esakal

जनावरांसाठी सकाळी वैरण आणणे, काळ्या आईची सेवा करण, कुटुंब-मित्रपरिवारांसोबत ते निवृत्तीनंतरचा वेळ घालवत आहेत.

pandurang sarnaik | Esakal

मात्र निवृत्तीनंतरही त्यांनी बंदूक सोडली नाही. अखंडपणे देशाची सेवा करण्याचे त्यांनी व्रत घेतले आहे.

pandurang sarnaik | Esakal

कुटुंबासोबत एकत्र राहण्याचा आनंद ते आता घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pandurang sarnaik | Esakal