पहिल्यांदा विमान प्रवास कराताना 'हे' लक्षात ठेवा

सकाळ डिजिटल टीम

पहिल्यांदा विमान प्रवास करताना आपल्या मनात असंख्य प्रश्न पडू शकतात, त्याचे एक कराण म्हणजे विमानतळांवर होणारी चेकिंग आणि इतर कारवाई.

विमानाने प्रवास करताना विमानतळावर तपासणी करण्यापासून ते बोर्डिंगपर्यंत अनेक प्रक्रियेतून जावे लागते.

प्रवासात प्रथम तुमचे प्लाइट शेड्यूल चेक करा, त्यामुळे डिपार्चर टाइममध्ये बदल झाला असल्यास तुमचा वेळ वाया जाणार नाही.

विमान प्रवासात फ्लाइट तिकीटाची प्रींट सोबत ठेवा, तसेच ओळखपत्र किंवा पासपोर्ट, पॅन कर्ड, वोटर कार्ड सोबत असू द्या.

तुम्ही ज्या एअरलाइन्सने प्रवास करताय त्यांचे लगेज नियम आधीच पाहून घ्या, त्यानुसार सामान पॅक करा

ज्या एअरलाइन्सचे तिकीट काढले आहे त्यांच्या काऊंटरला भेट द्या येथे फ्लाइट तिकीट आणि आयडी तपासल्यानंतर तुम्हाला बोर्डिंग पास मिळेल.

त्यानंतर तुमची आणि सामानाची सुरक्षा तपासणी होईल, आणि बोर्डिंग पासवर शिक्का मारला जाईल.

विमान उड्डाणाच्या आधी अर्धा तास टर्मिनलचे दरवाचे उघडतात, तुम्हाला बसने विमानापर्यंत नेले जाते.

विमानात गेल्यास तुम्हाला एअरहोस्टेस तुमचा सीट नंबर विचारुन तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्ही सीटच्या वर लगेजसाठीच्या जागी तुमची बॅग ठेवून द्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.