Sonalee Kulkarni : परीक्षकाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी

सकाळ डिजिटल टीम

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

सोनाली डान्स महाराष्ट्र डान्स लिटल मास्टर्स या नृत्यविषयक कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये परीक्षकाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

या शोच्या प्रोमोसाठी काढलेले छायाचित्रे तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

डान्सबाबत बोलताना ती म्हणते, डान्स हे माझे पहिले प्रेम आहे. त्यातून मी समृद्ध होत आहे.

माझ्या करिअरच्या प्रवासातील महत्त्वाचा हा हिस्सा आहे. हा मुलांसाठी त्यांचे गुणकौशल्य दाखवण्याचे व्यासपीठ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.