Sonali Bendre: अजुनही जशीच्या तशीच, सोनालीला हे जमतं कसं!

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूडमध्ये आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांची पसंती मिळवणारी अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेची ओळख आहे.

सोनालीनं गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तिनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तिनं बराचकाळ बॉलीवूडपासून लांब राहण पसंत केलं.

वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये सोनालीची झलक पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचा विकार जडला होता. त्यानंतर तिनं न खचता त्याला सामोरी गेली.

सोनालीनं आपल्या त्या आजारावर आणि संघर्षावर एका पुस्तकाचे लेखनही केले आहे.

सध्या ती डान्स इंडिया डान्स लिटल मास्टरच्या पाचव्या पर्वात दिसणार आहे. यावेळी तिनं आपला आताचा आणि 16 वर्षांपूर्वीचा फोटो पोस्ट केला आहे.

सोनालीच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.