सोनियांविषयी जाणून घ्या 'या' खास गोष्टी

धनश्री ओतारी

९ डिसेंबर १९४६ रोजी सोनियांचा इटलीत जन्म झाला. राजीव गांधींशी लग्न झाल्यानंतरही त्या राजकारणापासून दूर होत्या. पण राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांना नाइलाजाने राजकारणात सक्रीय व्हावे लागले.

२७ एप्रिल १९८३ मध्ये त्यांनी इटलीच्या नागरिकत्वाचा त्याग केला.

१९९८ मध्ये सोनिया यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गेली १९ वर्षे या पदावर राहणाऱ्या त्या एकमेव नेत्या आहेत.

अवघ्या २२ व्या वर्षी १९६८ मध्ये त्यांचं राजीव गांधी यांच्याशी लग्न झालं. या लग्नामुळे त्यांच्या घरचे नाराज होते. त्यांच कन्यादान अमिताभ बच्चन यांचे वडील कवी हरिवंशराय बच्चन यांनी केलं.

सोनिया गांधी या बहुभाषिक आहेत. त्यांना ९ भाषा येतात.

सोनिया गांधी याही खूप चांगल्या शेफ आहेत. सोनिया गांधी त्यांच्या सासू इंदिरा गांधी यांच्यासाठी पास्ता बनवत होत्या.

सोनिया गांधी अनेकदा राजीव गांधींसोबत दिल्लीच्या रस्त्यांवर दुचाकी चालवताना दिसल्या. आईस्क्रीम खायला त्या अनेकदा पतीसोबत इंडिया गेटवर जात होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.