'या' पदार्थांशिवाय अक्षय तृतीया ठरते अपूर्ण

नमिता धुरी

मुंबई : अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशीच्या विविध आख्ययिका ग्रंथांमध्ये पाहावयास मिळतात. या दिवशी काही गोडधोड आणि भोजनात वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची प्रथा आहे.

google

चिंचोणी

अक्षय तृतीयेच्या दिवशी वऱ्हाडात चिंचोणीला विशेष महत्त्व आहे. गुळ, चिंच, विड्याची पाने, काथ, चुना, चिकन सुपारी, वेलची, वाळा, भिजवलेले तांदूळ, खोबरे, चिंचेचा कोळ, तूप, लवंग, खसखस, मीठ यांपासून चिंचोणी तयार करतात आणि ती मातीच्या घागरीत ठेवतात. मातीचा सुगंध आणि त्यातील जीवनसत्त्वे चिंचोणीमध्ये उतरतात.

google

कैरीचे पन्हे

कुकरमध्ये कैरी उकडून तिची साले काढली जातात. कैरीचा गर आणि साखर किंवा गूळ यांचे मिश्रण एकजीव केले जाते. त्यात थोडीशी वेलचिपूड घालून हे मिश्रण गाळले जाते. यातून मिळालेला कैरीचा लगदा फ्रीजमध्ये ठेवला जातो व गरजेनुसार वापरला जातो. पन्हे तयार करण्यासाठी लगदा, थंड पाणी व थोडेस मीठ यांचे मिश्रण केले जाते.

google

नारळाच्या करंज्या

खोबरे, गूळ, वेलची पूड यांचे मिश्रण शिजवावे. रवा, मैदा, गरम तूप, गार दूध एकत्र करून मळावे. मळलेल्या पिठाच्या पोळ्या लाटून त्यात खोबेर-गुळाचे सारण भरून करंज्या कराव्यात.

google

दुधीचा हलवा

अक्षय तृतीयेसारख्या महत्त्वाच्या सणाला गोडाधोडाचे पदार्थ करणं ओघाने आलंच. दुधी हलवा हा त्यापैकीच एक. दुधी किसून तो साखर आणि दुधासह शिजवला जातो. यात सुकामेवाही घातला जातो.

google

मालपोआ

मैदा, दूध, साखर, सुकामेवा यांपासून मालपोआ तयार केला जातो. तयार केलेल्या पिठाचे छोटे-छोटे मालपोए भिड्यावर किंवा पॅनवर काढले जातात. अक्षय तृतीयेचा सण आणखी गोड करायचा असेल तर मालपोआ नक्की करावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

google