मसाले हे खाण्यातील आणि जीवनातील एक महत्वाचा हिस्सा आहेत. मसाले जेवणाला स्वादिष्ट आणि रुचकर बनवतात.
पोटात असणारे अॅसिडचे प्रमाण वाढवण्याचे काम वेलदोडे करतात. यामुळे शरीरातील अन्नाचे पचन चांगले होते.
मिरीमध्ये अधिक प्रमाणात एंटीऑक्सीडंट आणि अॅंटीबॅक्टेरियाचे गुण असतात. यामुळे जेवणातील स्वाद वाढतो.
पोटातील पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेकजण लवंग वापरतात. ही तिखट असते मात्र त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. खोकला आल्यानंतर लवंग खायचा सल्ला दिला जातो.
दालचिनी हा मसाला सर्दी-खोकल्याला नियंत्रित ठेवतो. तसचे मधुमेह आणि रक्तदाबालाही नियंत्रित करण्यास मदत करतो.
केसरमध्ये अॅंटी अॅंटीऑक्सीडंटचे गुण असतात. यामुळे शरीरातील काही अवयवांना सूज येत असेल तर ती कमी होण्यास मदत होते.