सकाळ डिजिटल टीम
नवनवीन ठिकाणं फिरायला जायला बहुतेकांना आवडतं. अनेकजण मे महिन्यात फॅमिली ट्रिपचा प्लॅन करतात.
आज आम्ही तुम्हाला मे महिन्यात भेट देऊ शकाल अशा सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
नैनिताल- मे महिन्यात नैनितालमधील वातावरण आल्हाददायक असते. येथे आपण नैनी झील, मॉल रोड, स्नो व्यू पॉइंट आणि बोटॅनिकल गार्डन अशा ठिकाणी भेट देऊ शकता.
मसूरी- मे महिन्यात भेट देण्यासाठी मसूरी हे सर्वोत्तम ठिकाण असून येथे तुम्ही पॅराग्लायडिंगची आणि ट्रेकिंगची मजा घेऊ शकता.
शिमला- हे उत्तर भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील टॉय ट्रेनमधून नक्की प्रवास करावा.
केरल- मे महिन्यात दक्षिण भारतात फिरण्याचा विचार करत असाल तर केरळ तुमच्यासाठी उत्तम ठिकाणं आहे. येथील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो.
दार्जिलिंग- हिमालयाच्या कुशीत वसलेलं दार्जिलिंग उन्हाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
पंचमढी हिल्स- मध्यप्रदेशातील हे ठिकाण मे महिन्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथील धबधबा, पांडव गुहा, सातपुडा राष्ट्रीय उद्यान इ. ठिकाणं प्रसिद्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.