'शेरनी'चा घायाळ करणारा लूक पाहिलाय? पहा जबरदस्त PHOTO

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री कायम नवनवीन लूक करत स्वत:ला लाईमलाईटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

यात कधी वेस्टर्न तर कधी ट्रॅडीशनल लूक करत त्या आपले वेगळेपण जपत असतात. पण, विद्या बालन याला अपवाद आहे.

नुकतेच 43 व्या वर्षात पदार्पण करणारी विद्या बालन आपल्याला नेहमी साडीत पाहायला मिळते.

साडीवर विद्याचं विशेष प्रेम असून ती कोणत्याही प्रकारच्या साड्यांमध्ये तेवढीच खुलून दिसते.

साडी ही विद्याची स्टाईल झाली असून तिच्याकडं साड्यांचं खूप मोठं कलेक्शन आहे.

भारतातील विविध प्रांतातील पारंपरिक साड्यांबरोबरच वेस्टर्न लूक देणाऱ्या महागड्या साड्यांचाही समावेश आहे.

विद्या वर्षाला 350 हून जास्त साड्या खरेदी करते.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती आपले साडीतील वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Vidya Balan