Munmun Dutta : तारक मेहता फेम 'बबीता'ने सांगितला डाएट प्लॅन

सकाळ डिजिटल टीम

तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील बबीता म्हणजे मुनमुन दत्ताने आपला डाएट प्लॅन सांगितला आहे. याबाबत तिने यूट्यूबवर प्लॅन चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

मुनमुन म्हणते, ती सकाळी साडेपाच वाजता उठते आणि सर्वात अगोदर खूप पाणी पिते. त्यानंतर ती जिमला जाते.

जीमला जाण्यापूर्वी मुनमुन केळी आणि काही सुकामेवा खाते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळू शकेल. व्यायामानंतर मुनमुन नाष्टा आवर्जून करते. यात पोहे, उपमा, दूध-कडधान्यांसह फळे खाते.

जेवताना काही जण कोला पिणे पसंत करतात. मात्र ते आरोग्यदायी नाही, असे करु नये. अभिनेत्री सांगते की दुपारच्या जेवणापूर्वी अर्धातास पूर्वी ती सफरचंद सायडर व्हिनेगर पिते.

दुपारच्या जेवणात अस्सल खाणे ती पसंत करते. दुपारच्या जेवणात घरचे साधं अन्न खाते. त्यात भात, डाळ, साग आणि भाज्यांचा समावेश असतो. मुनमुन दुपार आणि रात्रीच्या जेवणात सलाड आणि तूपाचा समावेश असतो.

संध्याकाळच्या खाण्यात फळे, किनोआ आणि भाज्यांचा समावेश ती करते. त्यानंतर अद्रक आणि लेमन ग्रास टाकून चहा बनवते. रात्रीचे जेवण हलकेसे घेणे पसंत करत असल्याचे ती सांगते. यात डाळ खिचडीसारखे गोष्टींचा समावेश असतो.

मात्र त्यापूर्वी ती टोस्ट आणि एक तळलेल अंड खाते. मूनमून म्हणते चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही दिवसभरातून सहा वेळेस थोड-थोड खाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.