'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka ooltah Chashmah) अन् त्यातील 'जेठालाल'(jethalal) म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी गेली १४ वर्ष प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहेत.
मालिकेत सर्वसामान्य दाखवलेले जेठालाल उर्फ दिलीप जोशी प्रत्यक्षात मात्र करोडोच्या संपत्तीचे आणि लक्झरी गाड्यांचे मालक आहेत.
मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी दिलीप जोशी लाखो रुपये घेतात अशी बातमी आहे.
मालिकेत भलेही जेठालालचा स्वभाव कंजूस दाखवलाय, पण ती भूमिका साकारणारे दिलीप जोशी मात्र प्रत्यक्ष आयुष्यात लक्झरी लाईफ जगतात.
दिलीप जोशी यांचा नेटवर्थ तब्बल ४३ करोड रुपये आहे. मुंबईत गोरेगाव येथे तब्बल ७ करोडच्या आलिशात घराचे ते मालक आहेत.
दिलीप जोशी यांच्याकडे Audi Q7,Toyota Innova, KIA Sonet अशा लाखोंच्या किमतीच्या लक्झरी गाड्यांचा ताफा देखील आहे.