पाहा, टॉलिवूडचा प्रिन्स, 'पोकिरी' महेशबाबूचा फिल्मी प्रवास!

श्रीनिवास दुध्याल

तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कृष्णा यांचा मुलगा महेशबाबू देशाला परिचित झाला तेलुगु चित्रपट 'पोकिरी'पासून.

महेशबाबू | esakal

महेशबाबूचा जन्म 1975 झाला. त्याने बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी 'नीदा' (1979) मध्ये छोट्या भूमिकेतून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.

महेशबाबू | esakal

बालकलाकार म्हणून त्याने आठ चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमारुडू (1999) मधून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले व त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी नंदी अवॉर्ड मिळाला.

महेशबाबू | esakal

महेशबाबूने ओक्कडू, अथडू, पोकिरी, दुकुडू, बिझनेसमन, सीतम्मा वाकिटलो सिरिमल्ले चेट्टू, श्रीमंतडू यांसारख्या अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले.

महेशबाबू | esakal

महेशबाबूच्या 'पोकिरी'ने सर्वाधिक कमाई करणारा तेलुगु चित्रपट होण्याचा विक्रम केला तर 'सरिलेरू नीकेव्वरू'ने बॉक्‍स ऑफिसवर 2.6 अब्जपेक्षा जास्त कमाई केली.

महेशबाबू | esakal

त्याने आठ नंदी पुरस्कार, पाच फिल्मफेअर दक्षिण पुरस्कार, चार दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तीन CineMAA पुरस्कार व एक आयफा उत्सवम यासह अनेक पुरस्कार जिंकले.

महेशबाबू | esakal

टॉलिवूडचा प्रिन्स म्हणून मीडियामध्ये महेशबाबूचा उल्लेख केला जातो. तो तेलुगु सिनेमातील सर्वांत लोकप्रिय आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहे.

महेशबाबू | esakal

महेशबाबूच्या चाहत्यांनी तेलुगु सिनेमाचा सुपरस्टार म्हणून त्याचा गौरव केला असून, त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महेशबाबू | esakal