Diabetes : 'या' कारणांमुळं लोकांना होतो डायबिटीज, वेळीच व्हा सावध

सकाळ डिजिटल टीम

जास्त गोड खाणे (Eating Too Much Sugar) : जास्त गोड (Sweet) खाल्ल्यानं रक्तातील साखर वाढते. या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीर इन्सुलिन सोडते. कालांतरानं, साखरेचं जास्त प्रमाण शरीराला इन्सुलिनला कमी संवेदनशील बनवतं. त्यामुळं मधुमेहाचा धोका वाढतो.

आनुवंशिक (Genetics) : आरोग्य तज्ज्ञ (Health Expert) म्हणतात, जर कुटुंबातील कोणाला मधुमेह असेल तर हा आजार होण्याची शक्यता वाढते. तर दुसरीकडं ज्या लोकांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास नाही, त्यांना या आजाराचा धोका कमी असतो.

लठ्ठपणा (Obesity) : जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त असतं, तेव्हा शरीराला रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नियंत्रित करणं कठीण होतं. यामुळं बहुतेक लोक प्री-डायबिटीसचे बळी ठरतात.

सुस्त जीवनशैली (Sedentary Lifestyle) : शरीर नेहमी क्रियाशील (Body Active) राहणं अत्यंत आवश्यक आहे. जे लोक व्यायाम (Exercise) करत नाहीत, त्यांना क्रॉनिक (Chronic) आजार होण्याचा धोका जास्त असतो. संशोधनानुसार जे लोक नियमित व्यायाम करतात ते मधुमेहापासून सुरक्षित राहतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diabetes Symptoms