ही आहेत जगातील सर्वात सुंदर शहरं

सकाळ डिजिटल टीम

जगभरात अशी अनेक सुंदर शहरे आहेत जी जीवनात एकदातरी नक्की पाहायला हवीत आज आपण अशाच काही शहरांबद्दल जाणून घेऊयात.

इंग्लडची राजधानी असलेल्या लंडन शहराचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून लाखो लोक येतात. इतिहास ते खाद्यपदार्थ अनुभवण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

क्योटो या जपानमधील शहराचे सौंदर्य देखील अतुलनीय आहे, तुम्ही येथे अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

पॅरिस हे जगातील सर्वात रोमँटीक शहर म्हणून ओळखले जाते, खासकरुन पॅरिसमधील संध्याकाळ अविस्मरणीय असते असे म्हटले जाते.

फ्लोरेंस हे इटलीमधील शहर देखील सौंदर्याने भरलेले आहे, येथील चर्च, संग्रहालये पाहण्यासारखे आहेत.

सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वात सुंदर शहर आहे, येथे तुम्ही ओपेरा हाऊस, मेरीटाइम, म्युझियम, बोटॅनिकल गर्डन इत्यादी ठिकाणे प्रसिध्द आहेत.

इटलीची राजधानी रोम पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात, रोमला फॅशन, खाद्यपदार्थ आणि सिनेमाचे शहर म्हटले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.