ऑफीसमधील या सवयी वेळीच बदलल्या नाहीत तर वाढेल वजन

| Sakal

उन्हाच्या संपर्कात न येणे

दिवसभर ऑफीसमध्ये असल्याने आपण उन्हाच्या संपर्कात येत नाही. परिणामी शरीरातील सर्केडियन रिदम अनियंत्रित होते व वजन वाढते.

| Sakal

रात्रपाळी

जे कर्मचारी रात्रपाळीची कामे करतात त्यांना नीट झोप लागत नाही. अशा व्यक्ती भूक लागल्यावर अति कॅलरीज खातात.

| Sakal

न जेवणे

जे कर्मचारी ऑफीसच्या कामामुळे जेवणे टाळतात ते कर्मचारी नियमितपणे जेवणाऱ्यांपेक्षा ४.५पट जाडे असतात.

| Sakal

अनहेल्दी कॅलरीज

कामात व्यग्र असल्याने चटपटीत, कुरकुरीत पदार्थ खाल्ले जातात. यामुळे आरोग्यासाठी हानीकारक अशा कॅलरींचे सेवन केले जाते. त्यामुळे पोट वाढू लागते.

| Sakal

नियोजन नसणे

कामाच्या व्यग्रतेमुळे आहाराचे नियोजन राहात नाही. अशावेळी जंक फूड खाण्याकडे कल दिसून येतो. त्यामुळे वजन वाढते.

| Sakal

घाईत खाणे

कामातून फार कमी वेळ मिळत असल्याने घाईत खाल्ले जाते.

| Sakal

खुर्चीत बसून राहाणे

बराच वेळ खुर्चीत बसून राहिल्यानेही वजन वाढते.

| Sakal