ताक आरोग्यासाठी फायदेशीर; मात्र, या लोकांना आहे पिण्यास मनाई

| Sakal

चेहऱ्यावर रोज ताक लावल्याने त्वचा खूप कोरडी होते. ताकामध्ये अनेक प्रकारचे ॲसिड आणि इतर घटक आढळतात. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांमध्ये तुमची समस्या वाढू शकते.

| Sakal

केसगळती आणि कोंड्याची समस्या टाळण्यासाठीही ताक वापरले जाते. परंतु, ताकाने जास्त केस धुतल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होते.

| Sakal

ताप आल्यास थंड आणि आंबट पदार्थ खाऊ नयेत किंवा पिऊ नयेत. त्यामुळे ताप आल्यास ताक किंवा दही खाऊ नये असा सल्ला नेहमी दिला जातो.

| Sakal

सांधेदुखी, स्नायू दुखणे अशा समस्या आहेत त्यांनी ताक पिऊ नये. जर तुम्ही ताक प्यायले तर सांधे जडपणा आणि दुखण्याची समस्या अधिक होऊ शकते.

| Sakal

सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर ताक सेवन केल्याने तुमची समस्या वाढू शकते. आयुर्वेदातही सर्दी-खोकला झाल्यास गरम पदार्थ घेण्याचा सल्ला दिला आहे.

| Sakal

ताकामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असल्याने काही गंभीर हृदय रुग्णांमध्ये ते कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करू शकते. ज्या लोकांना आधीच उच्च कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी ताक जास्त प्रमाणात सेवन करू नये.

| Sakal