Tiger Reserve: वाघाचं आश्रयस्थान! महाराष्ट्रातील 6 व्याघ्रप्रकल्प

सकाळ डिजिटल टीम

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघाच्या संरक्षणासाठी देशात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पांची (Tiger Reserve) सुरुवात झाली.

सुरुवातीला देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्यांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील सहा व्याघ्रप्रकल्पांत एकूण 190 वाघ आहेत.

1. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba-Andhari Tiger Reserve)- हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प असून एकूण १७२७.५९ चौकिमी क्षेत्रावर पसरलेला आहे.

2. पेंच व्याघ्र प्रकल्प (Pench Tiger Reserve)- नागपूरमधील पेंच व्याघ्रप्रकल्प एकूण ७४१.२२ चौ.किमी पसरलेला आहे.

3. अमरावतीमधील मेळघाट (Melghat Tiger Reserve)हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.

4. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (Sahyadri Tiger Reserve) महाराष्ट्रातील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे.

5. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प (Navegav-Nagzira Tiger Reserve) महाराष्ट्रातील अनेक वाघांचा आश्रयस्थान आहे. आहे.

6. बोर व्याघ्र प्रकल्प (Bor Tiger Reserve) - बोर व्याघ्र प्रकल्प १३८.१२ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेला महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचा पण तितकाच महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे.

महाराष्ट्रातील या व्याघ्रप्रकल्पांमुळे वाघांच्या अधिवासाचं रक्षण होऊन वाघांच्या संख्येत वाढ होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.