शाळा-महाविद्यालयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणार उमेदवारांना यांचे अनेकदा अभ्यासात लक्ष लागत नाही. अशावेळी काय करावे ?
योग्य जागा
जिथे शांतता असेल आणि तापमान नियंत्रित असेल अशा ठिकाणी बसा.
डू नॉट डिस्टर्ब
बराच वेळ अभ्यासाला बसायचे असल्यास खोलीच्या दारावर बाहेरून डू नॉट डिस्टर्बचा फलक लावा.
वेळापत्रक
सोप्या पद्धतीचे वेळापत्रक तयार करा जेणेकरून अभ्यासाचा कंटाळा येणार नाही.
डोके शांत ठेवा
अभ्यास करताना डोके शांत ठेवा. इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करू नका.
फोन दूर ठेवा
अभ्यास करताना फोन जवळ ठेवू नका जेणेकरून लक्ष विचलित होणार नाही.
पुरेशी झोप
झोप व्यवस्थित पूर्ण करा जेणेकरून एकाग्रतेने अभ्यास करता येईल.