चुकीच्या पद्धतीने केलेल्या मेकअपमुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. त्यामुळे जाणून घ्या मेकअपच्या अधिक चांगल्या पद्धती.
मॅट प्राइमर लावल्याने चेहरा ग्रीसी नाही दिसत. प्राइमर सेट झाल्यानंतर फाऊंडेशन लावू शकता.
ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने चेहऱ्यावर हेवी किंवा लाइट कवरेजवाले फाऊंडेशन लावा.
गालांवर ब्लश लावताना ते खालून वरच्या दिशेला लावा. त्यानंतर ते ब्रशच्या मदतीने नीट पसरवा.
ब्रशच्या मदतीने आयशॅडो आणि आय कॉर्नरला हायलाइट करा.
ओठांना ग्लॉसी लूक देण्यासाठी हलक्या रंगाचा लिपबाम लावा आणि लिप लायनर लावू नका.
परफेक्ट लूकसाठी सेटींग स्प्रे वापरा. यामुळे मेकअप स्थिर राहील आणि चेहऱ्याचा ओलावाही टिकून राहील.
तुमची त्वचा तेलकट असेल तर ब्लॉटिंग पेपर सोबत ठेवा. यामुळे तेलकटपणा काढता येईल.
मेकअप करण्याआधी अल्कोहोल नसलेल्या मॉइश्चरायजरने चेहऱ्याला हायड्रेट करा.