Resume बनवताना या गोष्टींची काळजी घ्या...

नमिता धुरी

रेझ्युमेमध्ये कठीण शब्द वापरल्याने चांगला प्रभाव पडेल असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. तसे न करता दैनंदिन आयुष्यात वापरले जाणारे सोपे शब्द वापरा.

रेझ्युमे बनवताना फॉन्ट साइज आणि फॉन्ट स्टाइल ठरावीक प्रकारचीच वापरा. अति मोठा फॉन्ट असेल तर रेझ्युमे चांगला दिसणार नाही.

नीटनेटका रेझ्युमे बनवण्याच्या नादात शब्दांच्या आणि ओळींच्या मधे भरपूर जागा सोडत असाल तर असे करणे टाळा.

नोकरीसाठी कुठेही अर्ज करण्यापूर्वी रेझ्युमेमध्ये कुठेही स्पेलिंगच्या चुका नाहीत ना याची खात्री करून घ्या.

काही वेळा लोक रेझ्युमेचा आकार वाढवण्यासाठी त्यात अशा काही गोष्टी लिहितात ज्याबद्दल त्यांना स्वत:लाही काही माहीत नसते. असे करणे टाळा.

रेझ्युमे नेहमी पीडीएफ स्वरुपात असावा जेणेकरून कोणालाही त्यातील तपशील नीट वाचता येईल.

फ्रेशर असाल किंवा अनुभवी असाल स्वत:चे नेतृत्व कौशल्य रेझ्युमेमध्ये ठळकपणे मांडा.

रेझ्युमेमधील माहिती सलग न लिहिता छोट्या-छोट्या भागांमध्ये विभागून लिहा. त्यानंतर आपले अनुभव प्रमाणपत्र व शिक्षणविषयक कागदपत्रे लावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.