सुस्मिता वडतिले
मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio): कारच्या बाबतीत मारुती सुझुकी भारतात टॉपवर आहे. मारुती सुझुकी अनेक लोकप्रिय कारच्या आधारे या सेगमेंटवर दीर्घकाळ राज्य करत आहे. त्याची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपये आहे.
टाटा पंच (Tata Punch): भारतातील SUV मार्केट झपाट्याने वाढत आहे. आता ग्राहक एसयूव्हीला अधिक पसंती देत आहेत. टाटा आधीच नेक्सॉन आणि सफारी लोकप्रिय मॉडलसोबत बाजारात आहे. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 5.48 लाख रुपयांपासून सुरू होते.
एम जी अस्टोर (MG Astor) : MG सध्या भारतीय कार बाजारात नवीन आहे, पण वेगाने पसरत आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.78 लाख रुपये आहे.
रेनॉ किगर (Renault Kiger) : रेनॉल्टचे हे मॉडेल अशा ग्राहकांसाठी आहे जे कमी बजेटमध्ये कार खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. कंपनीने ते फेब्रुवारी 2021 मध्ये लॉन्च केले आणि सध्या दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 5.64 लाख रुपयांपासून सुरू होते.
ह्युंदाई (Hyundai i20 N Line) : ह्युंदाईने ऑक्टोबरमध्ये हॅचबॅक सेगमेंटमध्ये हे नवीन उत्पादन लाँच केले. त्याची एक्स-शोरूम किंमत 9.84 लाख रुपयांपासून सुरू होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.