Kelghar Ghat : केळघर घाटातील ओसंडून वाहणारे धबधबे ठरताहेत पर्यटकांचं आकर्षण

सकाळ डिजिटल टीम

Kelghar Waterfall : सध्या परिसरात संततधार पाऊस सुरूय. केळघर घाटातील (Kelghar Ghat) ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे हे पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे.

हे धबधबे (Waterfall) पर्यटकांनी फुलून जात असून विशेषतः शनिवारी आणि रविवारी धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

केळघर घाटातील नयनरम्य धबधबे हे नेहमीच पर्यटकांच्या पसंतीचे ठरले आहेत.

दोन वर्षे कोरोनामुळं पर्यटनावर निर्बंध होते, त्यामुळं पर्यटकांअभावी हे धबधबे ओस पडले होते.

मात्र, सध्या पर्यटनावरील निर्बंध पूर्णपणे उठल्याने महाबळेश्वरकडं (Mahabaleshwar) जाणारे पर्यटक केळघर घाटातील नयनरम्य धबधबे पाहण्यासाठी आवर्जून थांबतात.

या धबधब्याभोवती पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kelghar Waterfall