नवीन वर्षाच्या पार्टीला तयारी कशी कराल?

भक्ती सोमण-गोखले

कुठल्याही पार्टीला लोकांना ड्रिंक्स घेणं आवडतं. पण ३१ डिसेंबरला ड्रिंक्स आणण्यासाठी गर्दी असेल.

त्यामुळे मद्यपान टाळून तुम्ही मॉकटेल्सचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी विविध पर्याय आहेत.

पोमोग्रेनेट पंच (Pomegranate Punch) करायचे असेल तर त्यासाठी अडीच कप पाणी, 2 कप डाळिंबाचा रस आणि लिंबाचा रस वापरून आवडत असल्यास धन-जीरं पावडर वापरून तुम्ही हे करू शकता.

स्कीनी ब्लडी मेरी (Skinny Bloody Mary) हा पर्यायही हटके आहे. यासाठी तुम्ही या पेयासाठी ग्लासमध्ये दोन कप टोमॅटोचा रस, दोन चमचे लिंबाचा रस घाला.एक चमचे वर्सेस्टर सॉस (सोया सॉस आणि व्हिनेगरचे मिश्रण) घाला. नंतर मिरचीचा सॉस घाला. त्यानंतर त्यात बर्फ मिसळा.

फॉक्स मजितो (Faux Mojito)-एक पिंट ग्लास एक तृतीयांश पाण्याने भरा, त्यात आवडीप्रमाणे पुदिन्याची पाने घाला. त्यात तीन चमचे लिंबाचा रस, दीड चमचा साखर घाला.आता हलक्या हाताने पानांना मॅश करा. पाने तोडू नका. ग्लासमध्ये बर्फ घाला आणि नंतर मिश्रण घाला.

मेयर लेमन सांग्रिया (Meyer Lemon Sangria) - एका बाऊलमध्ये सफरचंद आणि संत्र्याचे तुकडे घाला. त्यात तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला. पण खूप गोड चव नको कारण त्यामुळे पेयाची मजा जाऊ शकते. त्यानंतर अर्धा कप संत्र्याचा रस आणि एक चतुर्थांश कप लिंबाचा रस घाला.नंतर एक लिटर लाल द्राक्षाचा रस वरील मिश्रणात घाला. त्यात कापलेली फळे घालून तुम्हाला पिता येईल.

लव्हेंडर लेमोनेड (Lavender Lemonade Spritzer)- एका भांड्यात आठ कप पाणी उकळा. त्यात अर्धी वाटी साखर घालून मंद आचेवर पाच मिनिटे उकळू द्या. ते गॅसवरून उतरवून त्यात त्यात 6-8 चमचे लिंबाचा रस आणि लॅव्हेंडर घाला.ते थंड होऊ द्या, गाळणीने लव्हेंडर वेगळे करा. मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. मिश्रणात क्लब सोडा किंवा पाणी घाला. पार्टीत हे ड्रिंक मजा आणते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.