विकी कतरिनालाही पडली One Month Anniversary ट्रेंडची भूरळ

भक्ती सोमण-गोखले

विकी कौशल कतरीना कैफच्या लग्नाला एक महिना झाल्याचे फोटो दोघांनीही इंस्टाग्रावर शेअर केले आहेत. विकीने Forever to go! ❤️ अशी कमेंट केली आहे.

गेल्या महिन्यात ९ तारखेला त्यांनी राजस्थानला रॉयल वेडिंग केले होते. आता लग्नाला महिना झाल्याचे फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

काहींनी तर महिनाच झालाय, पुढे बघा... तर काहींनी एक मेहनेका पचताना... अशा काही कमेटं केल्या आहेत. कतरीनाने मंगळसूत्राबरोबर हा फोटो शेअर केल्यावर अनेकांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या.

कतरीना आता सातत्याने दोघांचे फोटो शेअर करते आहे. तिने ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो शेअर केला होता.

लग्नातल्या दोघांच्या लूकची चर्चा अजूनही सुरू आहे. दोघेही आता आपल्या कामाकडे लक्ष देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.