ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (Maharashtra Kesari Vijay Chaudhary) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय.
पंजाबचा पैलवान हिंद केसरी अजमेर सिंह (Hind Kesari Ajmer Singh) याला पराभूत करुन विजय चौधरी कन्हैया केसरी ठरले आहेत.
त्यांना कन्हैया केसरीची चांदीची गदा आणि तीन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. अहमदनगरच्या निघोजमध्ये कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धा (Kanhaiya Kesari Wrestling Competition) पार पडली.
निघोज इथल्या युवा उद्योजकांनी एकत्र येत मच्छिंद्र लंके यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
या स्पर्धेत राज्यातील मल्लांसह पंजाबहून हिंद केसरी ठरलेले अजमेर सिंह यांनी सहभाग घेतला.
कन्हैया केसरीसाठी विजय चौधरी आणि अजमेर सिंह यांच्यात निकाली कुस्ती झाली, ज्यात विजय चौधरी विजयी झाले.
त्यांना कन्हैया केसरी बहुमान देत चांदीची गदा आणि तीन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.