दारूमुळे यकृत खराब झाल्यास 'ही' लक्षणे जाणवतील...

नमिता धुरी

मुंबई : दारूचे सेवन हे यकृत निकामी होण्यामागील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्यास ते पचवण्याची यकृताची क्षमता संपते व यकृत निकामी होते. यकृत निकामी होण्याची लक्षणे नेमकी काय आहेत ते पाहू या...

तोंडातील कोरडेपणा

दारूचे सेवन केल्याने तोंडातील लाळ कमी होते किंवा नष्ट होते. त्यामुळे तोंडात कोरडेपणा जाणवतो. सतत पाणी किंवा थंड पेये पिऊनही तहान भागत नाही.

मळमळ

दारूमुळे मळमळ, उलट्या, अतिसार असे आजार होतात. शरीरात अनावश्यक पदार्थ साचून राहिल्याचा हा परिणाम असतो. थकवा जाणवतो आणि आजारी असल्यासारखे वाटते

आहारावर परिणाम

अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्याने भूक कमी होते. परिणामी आहार कमी होतो व शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांचा अभाव निर्माण होतो. यामुळे अशक्तपणा येतो, वजन कमी होते.

पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागात वेदना

अतिदारूमुळे पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागात वेदना होतात. याचाच अर्थ यकृताला सूज आलेली असते. यामुळे जखमाही होतात व यकृत पूर्ण निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यात असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.