Forbes India Rich List 2022: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी; पहा Top 10 List

निकिता जंगले

फोर्ब्सने 2022 ची 100 श्रीमंत भारतीयांची यादी (Forbes India Rich List 2020 जाहीर केली आहे. यातीलच देशातील टॉप टेन श्रीमंत पाहूयात.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानीहे सलग १५ व्या वर्षी फोर्ब्सच्या यादीतील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 90.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

फोर्ब्सच्या यादीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर्ससह देशातील दुसर्‍या क्रमांकाचे धनकुबेर म्हणून पुढे आले आहेत.

एचसीएल टेक्नोलॉजीजचे चेअरमन शिव नादर, 28.7 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह तिसर्‍या क्रमांकावर आहेत

सायरस पूनावाला 24.3 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह चौथ्या क्रमांकावर आहेत

राधाकिशन दमानी हे 20 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह पाचव्या क्रमांकावर आहेत

स्टील उत्पादक कंपनी के सीईओ लक्ष्मी मित्तल 17.9 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह सहाव्या क्रमांकावर आहेत

देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा समावेश आता फोर्ब्सच्या यादीत झाला आहे. जिंदाल समूहाची सुत्रे सांभाळणारे सावित्री जिंदाल 17.7 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह सातव्या क्रमांकावर आहेत

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला 16.5 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह आठव्या क्रमांकावर आहेत

सन फार्मास्युटिकल्सचे संचालक दिलीप संघवी 15.6 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह नवव्या क्रमांकावर आहेत

भारतीय अब्जाधीश बँकर आणि कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय सुरेश कोटक हे 14.3 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह दहाव्या क्रमांकावर आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.