हळदीचा कधी असा वापर केला का?

सकाळ डिजिटल टीम

डोळे येतात त्यावर हळदीच्या काढ्याने डोळे धुणे प्रशस्त असते. यामुळे डोळ्यांची आग, लालसरपणा, सूज कमी होते.

चेहऱ्यावर तारुण्यपीटिका, पुटकुळ्या, पुरळ, काळे डाग येत असल्यास हळकुंड व चंदन उगारुन लेप लावावा

रोज रात्री झोपण्यापुर्वी अर्धा चमचा हळदीचे चुर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास अतिरिक्त चरबीचे प्रमाण घटण्यास मदत मिळते.

कोणत्याही प्रकारे विषबाधा झाली असता दोन आठवड्यांसाठी अर्धा चमचा हळद तुपासोबत सेवन करावे

कुठेही जखम झाली की त्यावर हळद दाबून धरले की रक्तस्त्राव तर थांबतोच पण जंतुसंसर्ग न होता जखम सहजपणे भरुन येते.

भूक लागत नसली, तोंडाला चव नसली तर ओली हळद, आले, लिंबाचा रस आणि मीठ घालून केलेले लोणचे खाण्याचा उपयोग होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.