ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. तसेच दोन ग्लास तार प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो तसेच मूळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नेमाने वाटीभर ताक पिणे उत्तम आहे
अपचन होणे, किंवा पोटात जडपणा वाटणे, यासारखी लक्षणे असल्यास आल्याचा रस, पुदिन्याचा रस व चवीनुसार सैंधव मीठ ताकात मिक्स करून प्यावे.
फार वेळा शौचाला जावे लागत असल्यास तुपाची फोडणी दिलेले ताक प्यावे सोबतच लघवी साफ होत नसल्यास पातळ ताक पिल्याने लगेच बरे वाटते