World Liver Day: फॅटी लिव्हर आजार नेमका काय? जाणून घ्या लक्षणे

सकाळ डिजिटल टीम

दर वर्षी १९ एप्रिल हा जागतिक यकृत दिन (Liver Day) म्हणून पाळला जातो. यकृताच्या विविध आजाराबद्दल जनजागृती करणे, हा या दिनाचा उद्देश आहे.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे फॅटी लिव्हरसारखी समस्या उद्भवल्यास यकृताच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो.

फॅटी लिव्हर म्हणजे काय ?

यकृत पेशींमध्ये जास्त प्रमाणात चरबी साठल्यास फॅटी लिव्हर हा विकार उद्भवतो

कारणे - व्यायामाचा अभाव, जीवनशैलीमधील अनियमितता. पोटाची अतिरिक्त चरबी आणि जंकफूडचा आहारात वापर

लक्षणे - मधुमेह, मूत्रपिंड विकार, उत्साह न वाटणे, भूक मंदावणे, सिडीटी, पोट साफ न होणे

निदान - सर्वसामान्यपणे सोनोग्राफी केल्यास याचे निदान होऊ शकते. याबरोबरच फायब्रोस्कॅन, एमआरआय, या तपासण्याच्या मदतीने देखील माहिती मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.