कलिंगडामध्ये कॅलरी कमी आणि फायबर अधिक असते. त्याच्या नियमित सेवनामुळे वजन हळूहळू कमी करता येऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे कलिंगडाचे सेवन करता येऊ शकते.
कलिंगडाचा ज्यूस वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्याने शरीर डिटॉक्स केलं जातं.
कलिंगड नेहमीप्रमाणे छोटे छोटे तुकडे करूनही खाऊ शकता.
दिवसभर कलिंगड खाऊनही तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करू शकता. यादरम्यान कलिंगड सोडून इतर कोणताही आहार घेऊ नये.
कलिंगडाचं सेवन तुम्ही सलाडच्या रुपातही करू शकता.
सलाड बनविण्यासाठी तुम्ही त्यात किवी, स्प्राऊट्स आणि चीजसुद्धा टाकू शकता.
याशिवाय त्यामध्ये थोडंस व्हिनेगारसुद्धा मिक्स करू शकता. गार्निशिंगसाठी त्यावर पांढरे तीळ टाकू शकता.
सलाडशिवाय कलिंगडाची स्मूदी बनवून तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता.