जीन्सवर हे स्वेटर घालून मिळेल परफेक्ट लूक

सकाळ डिजिटल टीम

थंडी सुरू झाल्यावर महिलांच्या फॅशन आउटफिट्समध्येही बदल होतात. महिलांनी हिवाळ्यात जीन्ससोबत स्टायलिश वूल स्वेटर कॅरी करणे उत्तम पर्याय आहे. पार्टीपासून ऑफिसपर्यंत तुम्ही स्टायलिश स्वेटर कॅरी करू शकता.

हाय नेक स्वेटर - कितीही थंडी असली तरीही तुम्ही हाय नेक स्वेटर घालू शकता. यामुळे थंडीपासून तुमचे संरक्षण होईल. तसेच, उंच गळ्याच्या स्वेटरबरोबर तुम्ही जॅकेट, घड्याळे, ब्रेसलेट, बेल्ट घालू शकता.

ओव्हर साईज स्वेटर-जर तुम्हाला, एथनिक लूक हवा असेल तर तुम्ही हा स्वेटर घालू शकता. जीन्ससोबत तुम्ही हा सहज घालू शकता. ओव्हर साइजच्या स्वेटरमध्ये तुम्हाला अनेक रंग आणि डिझाइन्स सहज मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते खरेदी करू शकता.

शॉर्ट स्वेटर- ज्यांना लोकरीचे कपडे घालणे आवडत नाही, त्यांच्यासाठी शॉर्ट स्वेटर हा उत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्हाला वेस्टर्न लुक तर मिळेलच, पण थंडीही जाणवणार नाही. बाजारात शॉर्ट स्वेटर्समध्ये अनेक प्रकारचे डिझाईन्स बघायला मिळतात.

ऑफ शोल्डर स्वेटर - जीन्ससोबत ऑफ शोल्डर स्वेटरही कॅरी करू शकता. ऑफ शोल्डर स्वेटरमध्ये तुम्हाला क्लासी लूक तर मिळेलच, तुम्ही जीन्ससोबत साधा स्कार्फही घालू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.