AC roomमध्ये बसून त्वचा कोरडी झाल्यास काय कराल ?

नमिता धुरी

उन्हाळ्यात जास्त वेळ एसी रूममध्ये बसल्याने त्वचा कोरडी पडते. परिणामी खाज आणि जळजळ अशा समस्या जाणवतात. अशा वेळी काय करावे जाणून घ्या....

चेहऱ्यावर थोडा वेळ ऑलिव्ह ऑइल लावून ठेवा. नंतर ओल्या फडक्याने पुसा. यामुळे चेहऱ्यावरच्या छिद्रांमधील मळ निघून जाईल.

एवेकॉडोला ठेचून त्यात एक चमचा मध मिसळून ते चेहऱ्यावर लावावे. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेतील आर्द्रता टिकून राहाते.

पपई, दोन चमचे मध आणि एक चमचा मलई यांचे मिश्रण करा. हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा निघून जातो.

कच्च्या दुधात मध मिसळून ते चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची त्वचा मऊ आणि चमकदार बनेल.

नारळाच्या तेलातील फॅटी अॅसिड चेहऱ्यासाठी फायदेशीर असते. रोज झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने चेहऱ्यावर मालिश करा.

संत्रे, लिंबू आणि टरबूज यांच्या सालीने चेहऱ्यावर मालिश केल्यास त्वचेचा कोरडेपणा निघून जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.