इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp नवीन फीचर जारी करीत असून, या फीचरच्या यूजर्सना WhatsApp च श्रेणीनुसार शॉपिंक करता येऊ शकेल. शॉपिंग करणाऱ्यांसाठी हे फीचर खूप फायदेशीर ठरू शकते.
या फीचरमुळे व्यावसायिक खातेदार त्यांची उत्पादने कॅटलॉगमध्ये जोडू शकतील. श्रेणीनुसार वापरकर्ते त्यांना आवश्यक वस्तू सहजपणे शोधू शकतील. यासाठी त्यांना सर्व वस्तूंना स्क्रोल करण्याची गरज भासणार नाही.
तुमच्याकडे WhatsApp बिझनेस अकाउंट असल्यास, तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून कलेक्शन तयार करू शकता. यासाठी तुम्हाला ऍपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री-डॉटवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला बिझनेस टूल्सवर टॅप करावे लागेल.
येथे तुम्हाला कॅटलॉग पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला Add New Collection वर क्लिक करावे लागेल.
व्यावसायिक खातेदार त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करू शकतात. यासह युजर्सना स्वतंत्र वेब पेजशिवाय मोबाईल स्टोअरफ्रंट तयार करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
प्लॅटफॉर्मवर ई-कॉमर्स वैशिष्ट्ये वाढवण्यासाठी कंपनीने कार्टस फीचर जारी केले आहे. यामुळे ग्राहकांना अनेक वस्तू खरेदी करणे सोपे झाले आहे.