Pride Month 2022: जूनमध्ये LGBTQ समुदाय प्राइड परेड का साजरा करतो?

सकाळ डिजिटल टीम

LGBTQ समुदायासाठी जून महिना हा खूप खास आहे. हा महिना प्राइड मंथ म्हणून साजरा केला जातो.

न्यूयॉर्कमध्ये जून महिन्यात 1969 LGBTQ समुदायाच्या लोकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी पोलिसांनी समलैंगिक लोकांना पकडुन त्यांना मारहाण करुन तुरुंगात टाकले होते. त्यांना न्यायालयात दाद मागायला कोणतेही कायदेशीर अधिकार नव्हते.

अमेरिके पाठोपाठ इतर ठिकाणी प्राइड मंथ मोठ्या आनंदाने साजरा केला जाऊ लागला. भारतातही तो साजरा केला जातो. भारतात पहिली प्राइड परेड 2 जुलै 1999 रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात आली होती.

'कोलकाता इंद्रधनुष्य प्राइड वॉक' असे नाव देण्यात आले होते."सिटी ऑफ जॉय" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकाता येथील या परेडमध्ये फक्त 15 जण सहभागी झाले होते, आणि विशेष म्हणजे यात एकही महिला नव्हती.

त्या परेडला जवळपास 22 वर्षे झाली आहेत आणि तेव्हापासून ती देशातील अनेक राज्यांमध्ये/शहरांमध्ये आयोजित केली जाते. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, भुवनेश्वर, भोपाळ, सुरत, हैदराबाद, चंदीगड, ओडिशा आणि डेहराडून या शहरांचा समावेश आहे.

2018 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेवरील कलम 377 बेकायदेशीर घोषित केले. हे साजरे करण्यासाठी, LGBTQ समुदायाच्या लोकांनी देशभरात मुक्त नागरिक म्हणून मोर्चा काढला.आणि दिलखुलासपणे प्राइड परेड साजरी होऊ लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.