अक्कलदाढेचे दुखणे : आराम हवा असेल तर हे घरगुती उपाय करा

नीलेश डाखोरे

तोंडाच्या कोपऱ्यात असलेली अक्कलदाढ मोठी होते तेव्हा खूप त्रास होतो. दाढ पूर्णपणे काढून टाकणे हा एकच उपाय असतो.

जेव्हा दुखापत होते तेव्हा कापडात बर्फाचे छोटे तुकडे ठेवून गालावर हलक्याने शेक द्या.

मीठ हे दातांसाठी उपयुक्त असे औषध मानले जाते. तेव्हा मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.

अक्कलदाढेच्या समस्येसाठी लवंग तेल कापसाला लावून दाढेवर धरा. यामुळे वेदना आणि सूज दोन्ही कमी होतील.

अक्कलदाढेचा त्रास दूर करण्यासाठी हळद, मीठ आणि मोहरी मिसळून पेस्ट लावा. ही पेस्ट पोटात जाऊ देऊ नका.

जेवणात कडक पदार्थांचा वापर टाळावा.

सोजी, शिरा व वरणात भिजवून ठेवलेल्या पोळीचा आहार घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.