'बालिका वधू ते 12 वी फेल..'; विक्रांतनं प्रत्येक भूमिकेत जिंकली मनं, जाणून घ्या अभिनेत्याचा प्रवास

सकाळ डिजिटल टीम

'12 वी फेल'चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12 वी फेल' या चित्रपटानं सध्या बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

12th Fail Movie Actor Vikrant Massey

विक्रांतनं स्वबळावर मिळवलं यश

विक्रांत हा शीख आणि ख्रिश्चन दोन्ही धर्म पाळतो. कारण, त्याची आई शीख आणि वडील ख्रिश्चन आहेत. विक्रांतनं आज जे काही यश मिळवलं आहे, ते त्यानं स्वबळावर मिळवलंय.

12th Fail Movie Actor Vikrant Massey

दीपिका पदुकोणसोबत काम

2017 मध्ये विक्रांत मॅसीला A Death in Gunj Movie मधून नायक म्हणून ओळख मिळाली आणि त्यानंतर त्यानं दीपिका पदुकोणसोबत 'छपाक' चित्रपटात काम केलं.

12th Fail Movie Actor Vikrant Massey

विक्रांत रातोरात बनला टीव्ही स्टार

हे पात्र त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं आणि विक्रांत रातोरात टीव्ही स्टार बनला. आजही बरेच लोक त्याला 'बालिका वधू'चा श्याम म्हणून ओळखतात. विक्रांतनं 2007 मध्ये 'धूम मचाओ धूम' या टीव्ही शोमधून अभिनयाचा प्रवास सुरू केला. भूमिका छोटी होती, पण त्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

12th Fail Movie Actor Vikrant Massey

'बालिका वधू' शो ठरला टर्निंग पॉईंट

यानंतर कलर्सचा मोठा शो 'बालिका वधू' हा त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. यामध्ये त्यानं सुग्ना म्हणजेच विभा आनंदचे पती श्याम सिंह यांची भूमिका साकारली होती. गेल्या 17 वर्षात विक्रांतनं आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

12th Fail Movie Actor Vikrant Massey

रिअल लाईफ हिरो आयपीएस मनोज कुमार शर्मा

'12 वी फेल' हा चित्रपट रिअल लाईफ हिरो आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची आयआरएस पत्नी श्रद्धा जोशी यांच्यावर आधारित आहे.

12th Fail Movie Actor Vikrant Massey

विक्रांतनं साकारली आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका

केवळ 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात विक्रांतनं मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली असून, या चित्रपटानं देशातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

12th Fail Movie Actor Vikrant Massey

वयाच्या 9 व्या वर्षी चित्रपटात काम अन् एका चुकीनं 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रतिमा केली खराब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aruna Irani