12th Result : निकालाचं टेन्शन आलंय? असे रहा स्ट्रेस फ्री

धनश्री भावसार-बगाडे

आज १२ वीचा निकाल

आज १२ वीचा निकाल लागणार आहे, विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही टेन्शन येणं सहाजिक आहे. पण अशा परिस्थितही स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी काही उपाय जाणून घ्या.

12th Result | esakal

दीर्घ श्वास

पहिल्यांदा जेव्हा जेव्हा ताण येतो असं वाटेल तेव्हा पहिले मोठ मोठे श्वास घ्या. दीर्घ श्वास तुम्हाला ताबडतोब रिलीफ देईल.

12th Result | esakal

नकारात्मक विचार

टेन्शनमध्ये नकारात्मक विचार वाढतात. पण तुम्ही निकाला संदर्भात कोणत्याही नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.

12th Result | esakal

सकारात्मक विचार

मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना लगेच बाजूला करत सकारात्मक विचार करा. सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची आणि आयुष्यात उत्तम करण्याची क्षमता माझ्यात आहे असा विश्वास बाळगा.

12th Result | esakal

फोन कॉल्स टाळा

निकाल लागणार म्हटल्यावर नातेवाईक, मित्र परिवार यांचे फोन कॉल्स सुरू होतात. त्यात त्या विषयावर बोलून सहाजिकच टेन्शन वाढतं. त्यामुळे असे कॉल्स टाळा. गरजे पुरतेच फोनवर बोला.

12th Result | esakal

चॉकलेट खा

बऱ्याचदा टेन्शन घालवण्यासाठी गोड किंवा चॉकलेट खाणे हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे मनावरचा ताण कमी करणारे हार्मोन्स वाढू लागतात.

12th Result | esakal

पुढची तयारी

परीक्षे आधीच आपल्याला भविष्यात काय करायचे याच्या योजना बहुतेकांच्या झालेल्या असतात. त्यामुळे त्यानुसार २-३ पर्यायांची सखोल माहिती, प्रवेश प्रक्रिया, फी इत्यादीची माहिती मिळवण्यात मन गुंतवा.

12th Result | esakal

पालकांची भूमिका

मुलांबरोबर पालकांनाही टेन्शन येणं सहाजिक असलं तरी त्यांनी खंबीरपणे मुलांच्या पाठीशी उभे असणे आवश्यक आहे. स्वतः अजून मुलांना अवाजवी टेन्शन देऊ नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12th Result | esakal